खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

बेरोजगाराचे उपोषण मोडून खडणीचे गृहणे दाखल करण्याची धमकी.

कंपनीची दलाली करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बेरोजगार युवकास धमकी .!

यवतमाळ : झरी जामनी तालुक्यात अनेक कोळसा खदान, डोलोमाईन्स, सिमेंट उद्योग कारखाने असूनही येथील सुशिक्षित बेरोजगार युवकाच्या हाताला काम नाही.
लोकप्रतिनिधीकडे गेले असता शिफारस पत्र किंवा त्यांच्या जवळील दोन, तीन युवकांना कंत्राटी तत्वावर कंपनीमध्ये लावून मोकळे होत आहे.

लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गेल्यामुळे अनेक युवकाची कंपनी मध्ये लागल्यानंतर सुद्धा पिळवणून केली जाते. काही कंपनी मध्ये पी.फ तसेच विमा सुविधा सुद्धा दिल्या जात नाही.
काही युवक परस्पर कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्याकडे सम्पर्क करतात.पण कंपनी प्रशासनातील अधिकारी त्यांच्या कडे लक्ष देत नाही तसेच त्यांना आज घेतो उद्या घेतो म्हणून आश्वासनावर आश्वासन दिले जाते. 

त्यांच्या बायोडाटाकडे नंतर बघत सुद्धा नाही. या सर्व प्रकारामुळे त्रासून रोजगारासाठी आपल्याच परिसरात आपला झालेला हिरमोड बघून झरी तालुक्यातील बेरोजगार सुशिक्षित युवकानी सोशल माध्यमातून एकत्र येत संविधानिक मार्गानी लढण्याचा निश्चय केला आहे.

वेळ पडल्यास जी कंपनी स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त युवकासाठी प्रशिक्षण केंद्र उभारून रोजगार उपलब्ध करून देणार नाही त्या कंपनी विरुद्ध न्यायालयात याचिका सुद्धा टाकू असे सुद्धा युवकांकडून सांगण्यात आले.


जनसुनावणी वेळेस काही कंपनीनी स्थानिक, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त युवकांना प्रशिक्षण केंद्र उभारून रोजगार उपलब्ध करून देऊ असे तोंडी व लिखित आश्वासन सुद्धा दिले आहे. 
८०% स्थानिकांना रोजगार द्या असा शासनाचा आदेश असताना सुद्धा त्या आदेशाचे उल्लंघन तालुक्यातील काही कंपनी कडून केल्या जात आहे.

यामुळे काही कंपनी आणि प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषण करायचे ठरविले आहे. बेरोजगार युवकांच्या लढ्याला तालुक्यातील व बाहेरील अनेक नागरिकांनी, संघटनांनी, पक्षातील लोकप्रतिनिधींनी, सुद्धा पाठिंबा दर्शवीला आहे.
कँपनी मधील एका अधिकाऱ्याने प्रशासनातील एका हप्तेखाऊ वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी घेऊन सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या उपोषणाला प्रतिनिधित्व करणाऱ्या  काही युवकावर "खोटे खंडणीचे गृहणे दाखल करू व जबरदस्त मारहाण करू" अशी धमकी दिली..
त्यामुळे सध्या बेरोजगार युवकांच्या मनात एका कंपनी अधिकारी आणि प्रशासनातील लाचखोर, दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तीव्र असंतोष निर्माण झाला..
याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सर्व युवक लेखी स्वरूपात तक्रार देऊन त्या अधिकाऱ्याची बद्दली तसेच विभागीय चौकशीची मागणी करणार असे झरी तालुक्यातील संघटित झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाकडून सांगण्यात आले.

पुसद प्रतिनिधी : नितीन मनवर 
+91 96235 14358

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools