अहमदनगर : जिल्हातील राहुरी येथे संत गाडगे बाबा आश्रम शाळा येथे आरपीआय रिपाई (आंबेडकर गट) यांचा राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला ..!
यावेळी दिपकभाऊ निकाळजे यांनी सांगितले येणार्या महानगरपालिका ग्रांमपचायती यांचा निवडणुकांबाबत राज्य जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घोषित करण्यात येईल..!!
कोरोना महामारीचा काळात ज्या मागसवर्गीय कुंटुंबाला अर्थिक मदत मिळाली नसेल अशा कुटुंबाला आमचा पक्ष प्रयत्न कटिबद्ध राहील..
सरकारी योजना तळागळापर्यंत पोहचविण्यात सरकारला मजबूर करू.
पुणे, औरंगाबाद, पालघर, सोलापूर, ठाणे, मुंबई, अहमदनगर अशा अनेक शहरा मधून कार्यकर्ते मोठया संख्येत होते..
या वेळी अहमदनगरचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राकेश कापसे, शिरुर तालुकाध्यक्ष कृष्णा पंचमुख, राजन ब्राम्हणे, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात, महेश सुरळकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते..
राहुरी प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट
0 Comments