अहमदनगर : जिल्हयातील श्रीरामपूर येथून भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी सदैव उभे असणाऱ्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी
श्रीरामपूर येथील संस्कार भारती रांगोळी कलाकार सौ. कलावती राधाकृष्ण देशमुख यांनी स्वतः तयार केलेल्या 1950 राख्या लेह, श्रीनगर आणि जम्मू येथे कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांसाठी पाठविल्या.
आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर भारतीय सीमेवर देशाच्या रक्षणासाठी उभे असणाऱ्या सैनिकांना आपल्या बहिणीची आठवण येत असते
परंतु प्रत्येक जण घरी येऊ शकत नाही तरी त्यांना रक्षाबंधनाचा आनंद मिळवा व बहिणीची आठवण कायम राहावी याकरिता हा उपक्रम सौ. देशमुख यांनी राबविला.
या उपक्रमासाठी रिटायर्ड ब्रिगेडियर मा. हेमंतकुमार (मेडिकल सुप्रीडेडंट, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, लोणी) यांचे मार्गदर्शन मिळाले.
सदर उपक्रमासाठी सौ. देशमुख, रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे बन्सीलाल फेरवानी, सतपालसिंग,पत्रकार दत्तात्रय थोरात यांनी मेहनत घेतली.
श्रीरामपूर पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर श्री.सागर आढाव, श्री.विजय कोल्हे, श्री. गोरख दाहिवाळकर, श्री. बाळासाहेब गोडगे, श्री.निलेश कुलथे, श्री.अमोल मुळे,श्री.निलेश मैड यांनी हे पार्सल तातडीने पाठवण्याची व्यवस्था करून अनमोल सहकार्य केले.
तसेच सौ. देशमुख हे सामाजिक आणि धार्मिक कार्यात सतत कार्यरत राहून आपली कला सादर करत असता.
मागच्या महिन्यात सौ. देशमुख यांनी स्पेन येथील जागतिक गालिचा स्पर्धेत श्रीरामपूर चे प्रतिनिधित्व केल्याबद्दल पत्रकार दत्तात्रय थोरात, जालिंदर अल्हाट यांनी त्यांचे अभिनंदन केले व असेच उपक्रम त्यांच्या हातून होत राहावे अशा शुभेच्छा दिल्या.!
1 Comments
Big thanks to whole team of news 24 khabar for appreciating my work
ReplyDelete