पालघर : विक्रमगड आमदार सुनीलभाऊ भुसारा यांनी सहकाऱ्यांबरोबर मिळून 20 ते 22 टन धान्य पूरग्रस्तांसाठी एक छोटीशी मदत म्हणून पाठवली.
काही दिवसापूर्वी विक्रमगड तालुक्यातील दुमाड पाडा येथील कुटुंबातील व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
अशी माहिती मिळताच आमदार यांनी ठाकरे कुटुंबाचे सात्वन केले व तसेच मदतीची आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे यांनी मदत जाहीर केली..
जव्हार पासून काही अंतरावर असणारे धानोशी गाव रस्त्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. माहिती मिळताच समर्थक हनीफ उर्फ बाबुभाई आणि कार्यकर्ते त्या घटनास्थळी उपस्थित राहून गावातील लोकांना ये जा करण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना पर्यायी मार्ग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले.
खोडाळा गाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही .!
0 Comments