तुकाराम भाऊराव ऊर्फ शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म 1 ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावी झाला.
साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळला आहे.
तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले आहे.
तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते.
पोवाडे, लावण्या, गीतं, पदं अशा काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला अशा या साहित्यरत्नाची आज दि.१ ऑगस्ट रोजी जयंती चांदुर बाजार तालुका येथिल बेलोरा चौक येथे साजरी करण्यात आली..
यावेळी चांदुर बाजारचे नगराध्यक्ष नितीनभाऊ कोरडे, नगरसेविका सौ चंदाताई खंडारे, जीतूभाऊ भट्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सचिन भाऊ हिवराळे.
पंचायत समिती सदस्य राजेशभाऊ उससर्वे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण चव्हाण, सागर वानखडे, राजू वानखडे, अजय तायडे, मनीष खंडारे आणि इतर सदस्य उपस्थित होते.
0 Comments