जालना येथिल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्मान संस्था
इंदेवाडी ता जि.जालना शिवारामध्ये गट नं.32 मधील 97 आर जमिन निवासी प्रयोजनासाठी दिली असुन
सदरील जमिनीवर विकासकामे करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी आजपर्यंत 12 स्मरण पञे दिली असुन प्रत्यक्ष भेटूनही विनंती केली.
तसेच मा.उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी देखील विकास कामे करण्यास परवानगी देण्याचे आदेश देवुनही संस्था हि मागासवर्गीय असल्याने परवानगी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भिम आर्मी संघटक रंजित माने, जिल्हाअध्यक्ष सुभाष दांडेकर, भारत राऊत, वामन दांडगे, एम.यु.पठाण, सुनिताताई मगरे, रंजनाताई जाधव.
सुनिल पाडमुख, अशोक झिने, रवि ढाकणे, आकाश खाडे सह अनेकांच्या स्वाक्षर्या होत्या.
0 Comments