उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील दलीतावर झालेल्या अन्याया विरोधात कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे.
रिपब्लीकन सेनेचे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख मा. अनिल हजारे व चेतन जी शिंदे यांच्या नेत्रत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले आहे.
एकीकडे ७५ वा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा होत आहे आणि दुसरीकडे दलीत, ओबीसी, आणि इतर मागासर्गीयांना उपोषण करावे लागते फार मोठी शोकांतिका आहे असे सर्व सामाजिक संघटनेकडून बोलले जात आहे.
या उपोषणा मध्ये खामसवाडी येतील अन्यायग्रस्थ महिला,पुरुष, लहान मुले, वयोवृद्ध, आणि इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे..
त्यांच्या खालील प्रमाणे मागण्या आहेत.
१) खामसवाडी येथील गायरान जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमाकुलीत करा.
२) मा. सुप्रीम कोर्टाने तसेच महाराष्ट्र शासनाचा जी आर, पावसाळ्यात अतिक्रमित घरे पाडता येनार नाहीत असे असताना देखील गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नायब तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षक, यांनी अनाधिकृत पणे घरे पाडल्यामुळे यांच्यावर अनु.जाती जमाती आत्याचार प्रतीबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा.
३) मौजे खामसवाडी येथील अतिक्रमणे घरे पावसाळ्यात पाडल्यामुळे उघड्यावर पडलेल्या लोकांना तात्काळ घरे देण्यात याव्या.
४) मौजे खामसवाडी येथील गायरान जमिनीवरील घरांचे पत्र्याचे शेड पाडून नुकसान झालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी.
५) मौजे खामसवाडी येथील घरे पाडलेल्या अतिक्रमित लोकांची नावे भोगवट्या मध्ये घेण्यात यावी या व इतर मागण्यासाठी आमरण उपोषण चालु आहे..
0 Comments