उमरगा येथील तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख हिरक महोत्सव असा केला आहे.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाला किती वर्ष झाले हे माहीत नसणे व तसे जाहीरपणे बोलणे लांछनास्पद आहे.
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जाहीर भाषणात भाजप नेत्यांना झापड लगावण्याची भाषा केली होती.
त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेत मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या वक्तव्याचा गैर अर्थ घेऊन त्यांच्यावर सूडबुद्धीने विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.
त्यामुळे आघाडी सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी भाजपा कार्यकारिणी सदस्य संताजी चालुक्य, माधव पवार, दिग्विजय शिंदे, कैलास शिंदे, अनिल बिराजदार.
सुलोचना वेदपाठक, श्रीकांत मणियार, जयवंत कुलकर्णी, पंकज मोरे, प्रदीप सांगवे, दिलीप गौतम, गुलाब डोंगरे, धर्मराज जाधव आदी उपस्थित होते.
0 Comments