मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमीन गायरान धारकांच्या नावे कराव्यात जिल्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करावीत.
या मागणीसाठी लाल पँथर संघटनेच्या वतीने रविवारी कळंब उपविभागीय कार्यालयावर भाईबजरंग ताटे यांच्या नेतृत्वाखाली मो्चा काढण्यात आला.
मोर्चाला शिरांढोन येथिल ताजाखा पठान प्रतिष्ठान महाराष्ट्र क्रांती सेना यांनी पाठीबा दिला.
यावेळी जिल्हाअध्यक्ष माया शिंदे, मानव हित पक्षाचे जिल्हाअध्यक्ष हनुमंत पाटुळे, समाधान डोंगरे, बालाजी गायवाड, पांडुरंग कदम, धनजय ताटे यांची भाषणे झाली.
या मोर्चाला आमदार कैलास पाटील, शिवाजीआप्पा कापसे यांनी भेट देऊन मागण्या वरील स्तरावर पाठवू असे आश्वासन दिले.
याबाबतीत पूर्ण माहिती आमची पत्रकार प्रतिनिधी श्री अमोल रणदिवे यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली.!
संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत ...
१] गायरांन जमीन गायरान धारकांच्या नावे करण्यात याव्या.
२] कडकनाथवाडी येथील स्मशनभूमीचि वहिवाटी नुसार नोंद करण्यात यावी.
३] सर्व महामंडळे चालु करुन ५ लाखा पर्यंत कर्ज द्यावे.
४] कळंब येथील शासकीय विश्रामगृह समोरील शॉपिंग सेंटरला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे.
0 Comments