काय आहे प्रकरण पाहू या
विरार पश्चिम येथे यशवंत नगर मध्ये तुलिंज सोसायटी आहे, या सोसायटीत बरीच परिवार राहत आहे.!
एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला सोसायटीच्या इमारतीवरून खाली फेकन्यात आले. हे अर्भक फक्त दोन ते तीन दिवसाच होते.
सोसायटीच्या काही रहिवाशांनी त्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून जवळच्या रुग्णालय दाखल केले तरी डॉक्टर यांनी बाळाची प्रकृती चिंताजनक असून गंभीर शक्यता वर्तवली जात आहे.
या बाबतची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच पोलिसांनी तेथील एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पोलीस प्रशासन ह्या घटनेचा तपास घेत असून बाळाला कोणी फेकले आणि कितव्या मजल्या वरून फेकले हे पाहण्यासाठी सोसायटीत किंवा आजूबाजूस सीसीटीवी कॅमेरात काही फुटेज मिळेल का याचा कसून तपास करीत आहे तरी अर्भक फेकल्याचा तपास अजून उघड झालेला नाही अशी माहिती आमचे चॅनल पत्रकार सनील माहिमकर आणि प्रदीप शाह यांनी न्यूज ब्यूरो चीफ यांना दिला.!!
1 Comments
लाजिरवाणी घटना आहे, या मागे जो कोणी असेल त्याला तुडकुन काढलं पाहिजे.
ReplyDelete