उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात ठिक ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला उमरगा युवा सेनेकडून जोडे मारो आंदोलन
(सौजन्य : दैनिक जनमत)
कोरोना या सारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मित्र मंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने पालकाच्या जबाबदारी प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील बिकट परिस्थिती कुशलतेने हाताळली.
याची दखल घेऊन भारतातील अनेक सेवाभावी संस्था माध्यमांनी उद्धवजी ठाकरे यांना भारतातील कोरोना काळातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्याचा बहुमानही दिला.
या सर्व बाबींचा पोटशीळ उठून व मस्तरा पोटी तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याचा उन्माद होऊन नारायण राणे यांच्या द्वारे मुख्यमंत्री यांच्या विषयी राणे यांच्या वतीने नेहमी अपशब्द वापरले जातात असा आरोप युवा सेनेने केला.
असे युवा सेनेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे काल नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्या विषयी केलेल्या वक्तव्याचा उमरगा तालुका युवा सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच प्रकरणाची चौकशी होऊन नारायण राणे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन युवासेना उमरगा तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक उमरगा यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेना विधानसभा संघटक शरद पवार, युवा सेना माजी तालुका प्रमुख योगेश तपसाळे, सचिन जाधव,
तालुका प्रमुख अजित चौधरी, शिवसेना शहर प्रमुख जिडा सुरवसे, युवा सेना शहर प्रमुख अमर शिंदे, बलभीम येवते प्रशांत पोचापुरे, खयूम चाकूरे,
उद्धव बिराजदार, काका गायकवाड, महादू शिरसागर, विजय कदम, प्रदीप शिवणेचारी, सागर उमशेट्टे, लिंगराज स्वामी आदी उपस्थित होते अशी माहिती आमचे पत्रकार प्रदीप परताळे यांनी दिली.
0 Comments