भारतीय जनता पक्षाच्या मंत्री मा. डाँ भारती पवार यांचा पालघर जिल्ह्यातून विक्रमगड, वाळवंडा, जव्हार तालुक्यात जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत.
जव्हार तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकरते, महिला आघाडी पदाधिकारी, असे यावेळी स्वागतासाठी एकत्र येऊन गांधी चौक येथे भारती पवार यांचे स्वागत तालुकाध्यक्ष कुणाल उदावंत यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित असून ग्रामीण भागातील प्रसिद्ध असलेला तारपा नृत्य सादर करून, मान्यवरांचे मन आकर्षित केले गेले.
गांधी चौक येथे मान्यवर यांच्या हस्ते गांधीजींच्या पुतळ्याला फुलहार वाहून त्यांना नमन करून, तेथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुलहार वाहून नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत हरेश चव्हाण,अक्षय चव्हाण, विलास चव्हाण, राजेश यांच्या हस्ते करण्यात आले.
कुटीर रुग्णालय येथील कोविड सेंटरला महोदय यांनी भेट देऊन रुग्णांसाठी उत्तमात उत्तम सेवा उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
युवा आदिवासी संघामार्फत आणि पारस सहाणे यांच्याकडून निवेदन देण्यात आले.
आमचे पत्रकार इमरान कोतवाल यांनी मुलाखत घेतली. येथून रथयात्रा शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या शिरपामाळ या ठिकाणी रथयात्रा पोहोचले.
शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन रथ यात्रा अशा प्रकारे जव्हार तालुक्यात संपन्न झाली.
सचिन सटाणेकर, हरी भोये, विठ्ठल थेतले, कुणाल उदावंत, हरेश चव्हाण, विलास चव्हाण, शैलेश दिघा, चेतन पारेख, अक्षय चव्हाण.
नागेश उदावंत, माळी साहेब, लता रावळ , ज्योती भोये, अश्विनी पहाडी, कानोजा
तसेच समस्त भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
0 Comments