नाशिक : लासलगाव-विंचूर येथून जवळच विष्णू नगर फाट्यावर एका ट्रक ने कांद्यानं भरलेल्या ट्रॅक्टर ला धडक दिल्याने त्यामधील कांदा ट्रॉलीसह उलटला आहे. यात ट्रॅक्टर चालक जखमी झाला आहे.
नाशिक औरंगाबाद मार्गावरून शिंदेवाडी, ता. सिन्नर येथील शरद घोटेकर सकाळी ६:४७ वाजेच्या दरम्यान विंचूर बाजार समीतीकडे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर (क्र. एमएच १५ एचएम ३८५३) कांदे विक्रीस नेत असताना विष्णू नगर फाट्याजवळ ट्रक (एमएच १८ बीजी ३२९१) या क्रमांकाच्या ट्रक ने पाठीमागून ट्रॅक्टर ला धडक दिली.
यामुळे कांद्याने भरलेली ट्रॉली सह ट्रॅक्टर महामार्गावर उलटला व ट्रॉलीतील कांदे रस्तावर पडले. यामुळे कांदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
ट्रॅक्टर चालक जखमी झाला पण सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही.
ट्रॅक्टर रस्त्यात पलटी झाल्याने काही काळ वाहतूक ही ठप्प झाली होती; परंतु पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक जनतेच्या मदतीने कांदे दुसऱ्या ट्रॅक्टर मध्ये भरून पुन्हा वाहतूक सुरळीत केली.
0 Comments