रत्नागिरी : आरपीआय(ए) जिल्ह्याध्यक्ष पदी सुरेशदादा सावंत यांची सर्वानुमते नियुक्ती..
आंबेडकरी चळवळीत गेली अनेक वर्षे योगदान देणारे तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे गुहागर तालुक्यातील आरे येथील सुपूत्र सुरेश सावंत(दादा) यांची रिपब्लिकन पार्टी इंडिया(ए) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान नूतन जिल्ह्या ध्यक्ष यांच्या निवडीने गुहागर तालुक्यात कार्यकर्ते यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
जिल्हाच्या राजकारणात आंबेडकरी चळवळीतील आणखी एका पक्षाने एन्ट्री केली आहे.
सावंत यांनी सन 1997 पासून राजकियी कारकिर्दीला सुरवात केली होती त्यांनी आरे ग्रामपंचायत चे 10 वर्ष सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला तसेच ते विविध सामाजिक संस्थेवर काम केलं आहे.
सन 2012 ते 2017 मध्ये त्यांनी गुहागर पंचायत समिती उपसभापती सभापती पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.
आंबेडकरी चळवळीत सक्रियअसणारा आर पी आय(ए)पक्षाचा निळा झेंडा खांद्यावर घेतला,
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कामकाजाची दखल घेत त्यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड केली असून त्याना नियुक्ती पत्र दिले
यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते..
0 Comments