खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

शिक्षण अधिकार कायदा विद्यार्थी पालक कृती समितीची बैठक संपन्न

जालना - दिनांक २१/०८/२०२१ रोजी ४८८ येथील गेस्ट हाऊस अंबड चौफुली जालना येथे शिक्षण अधिकार कायदा विद्यार्थी पालक कृती समितीची बैठक पार पडली..
यावेळी शिक्षण अधिकार कायद्याची व्याप्ती वाढवण्यात यावी, २०१२ पासून शिक्षण अधिकार कायद्याच्या अमलबाजवणीला  सुरुवात झाली आणि आज आज RTE च्या अंतर्गत प्रवेशित विद्यार्थी ८ वी पास होऊन पुढील वर्गात प्रवेशित आहे व काही पालकांनी पाल्यांना इंग्रजी शाळेतून कधीं इतरत्र प्रवेश घेत आहे,

कारण त्यांना या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची लाखो रुपये भरून शिक्षण घेणे शक्य नाही RTE हा कायदा 12 वी पर्यंत लागू केला पाहिजे. 

शिक्षण अधिकार कायदा हा अपूर्ण असून त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण घेऊन मध्येच शिक्षण सोडावे लागते आणि आज मग्रूर शिक्षण संस्था चालक फीस साठी विद्यार्थी व पालकांची अडवणूक करत आहे.

ती त्वरित थांबवावी.फीस साठी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्यास भाग पाडले जाते, याविषयी समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व अश्या प्रकारची मुजोरी करणाऱ्या शाळांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.

लॉक डाउन मुळे पालकांनाचा रोजगार गेल्याने पालकांसमोर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.म्हणून सरकार चा फीस संदर्भात निर्णय येईपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करू नये.

अशी मागणी ही या बैठकीत समोर आली.या कायद्या व्याप्ती वाढवून ८ वीच्या पुढील विद्यार्थ्यांना देखील लाभ मिळाला पाहिजे यांविषयी सविस्तर चर्चा झाली येत्या काळात विद्यार्थी संघटना व शिक्षण अधिकार कायदा विद्यार्थी पालक समितीच्या वतीने जालना शहरात विद्यार्थी व पालकांचा मेळावा घेऊन वरील प्रश्नांसंदर्भात संघर्ष करण्याचा निर्धार बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

यावेळी  समितीचे निमंत्रक वैजीनाथ लोंढे,व sfi चे राज्यउपाध्यक्ष ऍड.अनिल मिसाळ यांनी उपस्तीताना मार्गदर्शन केले.व आंदोलनाची नियोजन करण्यात आले.

यावेळी समितीचे अनिल गायकवाड किशोर बिरकायलू, गोपाल बींगी, गौरव चव्हाण, 
कैलास भारतीया, शाम लोखंडे, योगेश नवगिरे, समाधान घोरपडे, जोसेफ आठवले, संगीता हिवाळे, संतोष गाढे, रेखा आठवले, कल्पना कसबे, इ.पालक बैठकीला उपस्थीत  होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools