या निराधार मुला - मुलींना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे 'राष्ट्रवादी जिवलग' हा उपक्रम आयोजित केला आहे.
या उपक्रमात राज्यभर निराधार मुला - मुलींना दादा, काक, काकू, मामा मामी, अक्का ताई मिळणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश सचिव नित्यश्री नागरे यांनी आमचे संगमनेर न्यूज 24 खबर चॅनल पत्रकार अमोल घुगे यांना दिली..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार संसदपटू सुप्रियाताई सुळे यांनी नुकतीच नित्यश्री नागरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेश सचिव पदी निवड करून नियुक्तीपत्र दिले आहे.!!
कोरोना काळात जे मुले अनाथ निराधार झाली त्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही भेटत आहोत त्यांना भेटल्यावर त्यांची दयनीय अवस्था समोर येत आहे..!
काही मुला मुलींना त्यांच्या नातेवाईकांनी आश्रय दिला परंतु अजूनही असे बरेच मुलं आहेत जी निराधार अनाथ म्हणून जगत आहे. अशा मुला मुलींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्य औचित्य साधून दत्तक घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुप्रियाताई सुळे यांचे नेतृत्वात करित आहे.
असे 450 मुला मुलींचे नावे आमच्या पर्यंत पोहचली आहे असे नित्यश्री नागरे यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एक एक मुलांचे पालकत्व स्वीकारत असून त्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, मानसिक दृष्ट्या सक्षम करणार आहोत असे आमचे पत्रकार अमोल घुगे यांना नित्यश्री नागरे यांचे वतीने सांगण्यात आले.!
0 Comments