अहमदनगर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) आंबेडकर गटाचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष पदी सनी जगताप तसेच युवक राहुरी तालुका उपाध्यक्ष पदी प्रतीक खरात यांची निवड ..
राहुरी तालुक्यात संघटनात्मक कार्याची घडी बसवुन तसेच विशेषता तरुणांना संघटनेमध्ये कामाची संधी देऊन येत्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट आपली ताकद दाखवून देईल.
सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमीच कार्य करीत राहील असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी केले आहे..
याबाबत माहिती अशी की रविवार दिनांक ८ ऑगस्ट २०२० रोजी विश्रामगृह येथे झालेल्या बैठकी मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील निवडी जाहीर करण्यात आली.
त्यावेळी सनी जगताप यांना राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष पदी तर राहुरी तालुका युवक उपाध्यक्षपदी प्रतीक खरात यांची निवड करण्यात आली व तशा आशयाचे पत्र जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते या दोघांना देण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे.
या संघटनेमध्ये युवकांना मानाचे स्थान देऊन त्यांना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गरिबांन वरील अन्याय अत्याचार दूर करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सामाजिक दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करून कोठेही संघटनेची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्यावी.
व येत्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज राहावे.
यावेळी महेश सुरडकर उत्तर जिल्हाध्यक्ष, राकेश कापसे जिल्हा सचिव, राजन भाऊ ब्राह्मणे जिल्हा संघटक, सतिष चक्रे राहाता तालुका उपाध्यक्ष, विजय बोरुडे.
विलास बोरुडे राहुरी युवक तालुका अध्यक्ष, शामभाऊ जाधव अनिल, पलघडमल तालुका उपाध्यक्ष, रमेश पलघडमल, विशाल परदेशी सह असंख्य भिमसैनिक उपस्थित होते..
0 Comments