खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाही तर कामगार सामूहिक आत्मदहन करणार

अहमदनगर : राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २५ कोटी ३६ लाख रुपये देणी खा.डॉ.सुजय विखे यांनी त्वरित न दिल्यास कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाहीतर कामगार सामूहिक आत्मदहन करणार आहे.
कामगारांचे २५ कोटी ३६ लाखाची थकबाकी खा.डॉ.सुजय विखे मागिल ५ वर्षात वेळोवेळी दिलेल्या शब्दप्रमाणे पूर्ण करावी अन्यथा कामगार उपोषण दरम्यान विविध प्रकारचे आंदोलन छेडणार आहेत. 
यावेळी मात्र कारखाना व्यवस्थापन व डॉ.सुजय विखें यांनी कामगारांच्या मागण्याबाबत लेखी आश्वासन तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांना द्यावे त्यांच्या मार्फतच लेखी आश्वासन स्वीकारण्यात येईल 

असे इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे यासह कामगारांनी दिला आहे. 
या आंदोलनात २०० ते २५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. 
आंदोलनास आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी पाठींबा दिला अशी माहिती पत्रकार जालिंदर अल्हाट यांनी दिली.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools