खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भाजपच्या आंदोलनाची दखल घेत दिव्यात नवीन लसीकरण केंद्राला मंजुरी देण्याची प्रशासनाची तयारी.

रत्नागिरी : भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेनंतर दिव्यातील नगरसेवकांची आणि पालिका प्रशासनाची धावपळ

भाजपच्या आंदोलनाची दखल घेत दिव्यात नवीन लसीकरण केंद्राला मंजुरी देण्याची प्रशासनाची तयारी.

पाच लाख लोकसंख्येला एकमेव लसीकरण केंद्र, तिथे होणारी वशिलेबाजी, ढिसाळ कारभार, रात्रीपासूनच लागणाऱ्या रांगा या सर्वांचा विरोध करत दिवा विभागात लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी यासाठी भारतीय जनता पार्टी, दिवा विभागाने रणशिंग फुंकले होते.
 
रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची भाजप ने पोलखोल केल्याने नवीन तयार रस्ता खोदण्याची नामुष्की पालिकेवर आली होती. 
त्यामुळे आता दिवा भाजपच्या आक्रमकतेची जाणीव झाल्यामुळे लसीकरण केंद्र वाढविण्याच्या आंदोलन होण्यापूर्वीच पाच महिने गाढ झोपेत असलेले नगरसेवक व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि वाढीव लसीकरण केंद्राच्या मागणीचे पत्र महापौरांना देत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना नगरसेवकांनी केल्याचे दिवावसीयांना बघायला मिळाले.


दिवा पश्चिम, साबे गाव, मुंब्रादेवी कॉलोनी येथे लसीकरण केंद्र कधी?

असा सवाल भाजप ने केला असून अशा महत्वाच्या आणि दाट लोकवस्ती असणाऱ्या विभागात फिरते लसीकरण केंद्र सुरू करावे व अस्तित्वात असणाऱ्या केंद्रावर जादा डोस उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools