निराधार, वृद्ध, अपंग, मुकबधीर, कर्णबधिर, शेतकरी, शेतमजूर, आदी लाभार्थीना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना, अपंग कल्याण योजना आदी योजनेंतर्गत कक्षेत येणाऱ्या लाभार्थीची वयाच्या प्रमाणपत्रांसाठी अडवणूक होत असल्याने कार्यालयात सर्व लाभार्थी यांची उपस्थिती.!!
आज दिनांक 3/8/2021 रोजी मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. वंलाडे, डॉ. फुलारी यांना भेटून वयाचे प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली.
ज्या गोर-गरीबांचे वय, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, किंवा राशन कार्ड वर 65 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रे घेण्यात येऊ नये अशी विनंती योजनेचे नायब तहसीलदार पंगे यांना मागणी करण्यात आली..
यावेळी शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेशभाऊ पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते..
0 Comments