उस्मानाबाद : कळंब उपविभागीय कार्यालयावर लाल पँथर संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला .
यावेळी कळंब तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गायरान धारक व पारधी समाजातील महिला, मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते .
यावेळी संघटनेचे अध्यक्ष भाईबजरंग ताटे यांनी मोर्चाला संबोधित केले .
निवेदनातून प्रमुख मागण्या खालील प्रमाणे.
१)गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करा
२) मौजे काक्रंबा तालुका तुळजापूर येथील मातंग समाजातील मुलांचा निर्घृण खून करण्यात आला आहे संबधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी .
३)मौजे युवती तालुका तुळजापूर येथील युवतीवर बलात्कार झालेला आहे त्या आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी .
४) मराठवाड्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील १९९३ पूर्वी निवासी अतिक्रमण करुन राहत असलेल्या पारधी, दलित, मुस्लिम, आदिवासी इतर मागासवर्गीय, मराठा इत्यादींचे नावे जागा करा .
५) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.
६) क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात.
अशा प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करून आमचे न्यूज 24 खबर चॅनल पत्रकार श्री अमोल रणदिवे यांना बोलताना लाल पॅंथर संघटना प्रमुख भाईबजरंग ताटे यांनी सांगितले..!!
0 Comments