रत्नागिरी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या खेड तालुका प्रभारी अध्यक्ष पदी लवेल गावचे
आंबेडकर चळवळतीळ जेष्ठ नेते सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असणारे
मा शंकर गणू तांबे यांची निवड
आरपीआय खेड तालुका पक्षाचे तालुका निवड समिती आणि जेष्ठ यांच्या समवेत करण्यात आली.
यावेळी कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गौतम तांबे,
मिलिंद तांबे, आर पी येळवे, बाळकृष्ण देवळेकर, युवक अध्यक्ष विकास धुत्रे, महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा तांबे, सरचिटणीस सुरेंद्र तांबे,
शहर अध्यक्ष दिपेंद्र जाधव आदी उपस्थित होते..
खेड जिल्हा परिषद शासकीय विश्राम गृह येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब
यांच्या ८ आगस्ट २०२१ रोजी पूरग्रस्त भागाचा पोसरे येथील दुर्घटना तलवट जावळी या गावातील
पुनवर्सन आणि खेड व चिपळूण दौवऱ्याचे नियोजन संदर्भात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
0 Comments