नांदेड : मुखेड तहसीलवर संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन
क्रांति दिनाच्या निमित्ताने मुखेड तहसील कार्यालयावर संयुक्त किसान मोर्च्याच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
शेतकरी-शेतमजूर विरोधी तीन जुलमी कायदे मागे घेणे व इतर 20 मागण्या करण्यात आल्या.
यावेळी अखिल भारतीय शेतमजूर युनियन, किसान सभा, सीटू, युवक संघटना, DYFI, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया संघटना आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या.
जनविरोधी धोरणे घेणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मा. तहसीलदार यांना मुख्य निवेदन देण्यात येऊन स्थानिक मागण्या संदर्भात चर्चा करून येत्या सोमवार पर्यंत रेशन चा विषय मार्गी लावण्याचे तहसीलदार यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले.
घरकुलाच्या प्रश्नासंदर्भात गटविकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा होऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुखेड तालुक्यात रोहयो कामाच्या संदर्भात येत्या नोव्हेंबरमध्ये काम देणे,जॉब कार्ड लवकर काढुन देणे.असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी शेतमजुर, शेतकरी, युवक, आशा सेविका, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात माकपचे मुखेड तालुका सचिव कॉम्रेड विनोद गोविंदवार, SFI या विद्यार्थी संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड बालाजी कलेटवाड.
शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉम्रेड अंकुश अंबुलगेकर तसेच जिल्हाउपाध्यक्ष कॉ. माधव देशटवाड, डीवायएफआयचे कॉ. अंकुश माचेवाड, एसएफआयचे कॉ. शंकर बादावाड, तथा जिल्हाध्यक्ष कॉ. विजय लोहबंदे.
सिटूच्या रेणुका देवकत्ते, किसानसभेचे कॉ. राजू पाटील, कॉ. लक्ष्मण भोकसखेडे, कॉ. रेणुका तुरेवाड, कॉ. पंढरी देशटवाड, कॉ. बालाजी कल्याणपाड.
कॉ. अजीज कुरेशी, कॉ. अंबादास कांबळे इत्यादी असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सामिल होते
0 Comments