खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नाशिक मधील सराफा दुकानातून शुक्रवारी 24 सप्टेंबर भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी

नाशिकः नाशिक मधील सराफा  दुकानातून शुक्रवारी 24 सप्टेंबर भरदिवसा 15 तोळे सोने आणि 6 हजारांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.
नवीन नाशिकमधील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानात आज शुक्रवारी सकाळी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी 15 तोळे सोने आणि सहा हजारांची रोकड लंपास केली आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सद्गुरू अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. 

त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराना दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. 

त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि विभांडक यांनी दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली. एकूण 150 ग्रमॅ वजनाचे हे सोने असून त्याची किंमत 7 लाखांच्या घरात आहे. 

या धाडसी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. 

सराफा दुकानात आणि दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे चोरटे या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. 

अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools