अहमदनगर : भीम आर्मी महाराष्ट्र प्रमुख संघटक दिपकभाऊ भालेराव यांच्यासह अन्य संघटनेकडून निवेदन मागणी.!
मागणी पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नावाने राहाता तालुक्यातील तहसिल कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन.
▪️ ▪️प्रमुख मागण्या खालील प्रमाणे ▪️▪️
1) नगर मनमाड महामार्गाचा रस्ता डांबरीकरण करणे.
2) महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा कॉलेज सुरू करणे.
3) चितळी रोडवर दररोजच्या बाजार विक्री करणारे शेतकरी व व्यापारी यांना जुना बाजार तळासाठी शासकीय ठिकाणी जागा देणे.
यासाठी तहसिल कार्यालय (तहसीलदार) व नगर पालिका (मुख्याधिकारी) , राहता पोलिस ठाणे (पोलिस निरीक्षक) यांना निवेदन देण्यात आले आहे.
जर पाच दिवसांच्या अवधीमध्ये काम चालू नाही झाले तर 6 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटा - नाद आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख -संघटक दिपकभाऊ भालेराव यांनी दिला.
त्यावेळी उपस्थित पदाधिकारी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दिपक भालेराव, भीम शक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, राहाता तालुका अध्यक्ष सुनील मोकळ, कार्याध्यक्ष विनोद साबळे,जगन पारवे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती आमचे पत्रकार जालिंदर अल्हाट यांनी दिली.
0 Comments