उस्मानाबाद - राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांनी केली तेरणा नदीच्या पुरातील अडकलेल्या व्यक्तींची आणि नुकसानीची पाहणी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनां माहीती देताच एनडीआरएफ टीम हेलिकॉप्टरसह काही वेळातच उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार
उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमध्ये अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश (दाजी ) बिराजदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांना माहिती दिली आहे.
सदरील माहिती मिळताच अजितदादा पवार यांनी एनडीआरएफ टीम ला हेलिकॉप्टर सह उस्मानाबाद जिल्ह्यात जाण्याचे आदेश दिले असून काही वेळातच टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे.
तेर जिल्हा उस्मानाबाद येथे अतिवृष्टीमुळे तेरणा नदी ला पूर आल्याने शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक व्यक्ती पुरामध्ये अडकलेल्या असून त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी करत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची भयावह सद्यस्थितीतुन अवगत केले आहे .
उस्मानाबाद परिसरातील तेरणा नदीच्या पात्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिक पुरात अडकले आहेत त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी घटनास्थळी मदतीसाठी हजर आहेत.
जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार विविध ठिकाणी जाऊन पाहणी करीत आहे.
0 Comments