संगमनेर : प्रवरा नदीच्या काठावर संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील असणाऱ्या प्रतापपूर गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले स्व॰ दादापाटील सखाराम आंधळे यांनी आपल्या जिद्दीने, कल्पकतेने, दुरदृष्टीने जनसामान्यांसाठी सर्वांगीण विकासासह आध्यामिकाचे आयुष्यभर केलेले काम पुढील पिढीतील अनेक सर्वसामान्य लोकांना दिशा देणारे आहे...
खर्या अर्थाने आध्यामिक व लोकसेवेच वारसा घेतलेल्या दादापाटील आंधळे (दादा) यांचे जीवनकार्य हे समृध्द ठरले.
शेतकरी कुटुंबातील जन्म प्रतापपूर या गावी प्राथमिक शिक्षण घेत असतांनाचं वडीला समवेत गावोगावी हरिनाम सप्ताहाला जात असे मात्र पहीला हरिनाम सप्ताह उंबरी बाळापूर येथील उपस्थितीमुळे लहानपणीचं त्यांना परमार्थाची गोडी लागली.
तेव्हा सरला बेटचे मठाधिपती कोडाजी काका यांच्या काही काळ संपर्कात आले पुढे नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात राहून गावोगावी ३५ वर्ष सप्ताहाचा पहारा दिला;
नारायणगिरी महाराज यांच्या परखड स्वभावावर प्रभावीत झाल्याने साक्षात आपण देवाला बघितले असे सातत्याने सांगत;
आधात्मिकामुळे आप्पानंद महाराज, ब्रम्हानंद महाराज याांच्यासह अनेकांचा त्याना सहवास लाभला, तर गेल्या १० ते १२ वर्षा पासून रामगिरी महाराज याचाही सहवास लाभला केवळ आध्यामिकाचे गुण स्वत: पुरते न अंगीकरता कुटुबासह, मित्र परिवार, नातलग व समाज्यातील घटकानाही महत्व पटवून दिले.
आपल्या नवनाथ नावाच्या मुलांनी ही वडीलाचा आदर्श घेत सरला बेटशी नाळ जुळवून घेतल्याने ते रामगिरी महाराज यांचे अतिशय विश्वासू शिष्य तसे ना बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू कार्यकर्ते बनले.
दादापाटील यानी केवळ आध्यामिकाची कास धरली नाही तर प्रपंच्यात आई वडील व भावंडाचा सभाळ केला मुलांवर चांगले संस्कार घडविले.
सामाजिक दायित्व निभवताना त्याला राजकारणाची जोड लागते हे सर्व साध्य करताना साथ लागते ती केवळ नि:स्वार्थि पणे अर्धागिणी निभावते.
त्या सावित्री बाईनी प्रपांच्यात येणाऱ्या सुख दु:खात साथ दिली; शेती व्यवसाय करुन संसाराच्या वेलीवरील संपत, नवनाथ, लक्ष्मण, कुसुम चार मुलांना चांगले संस्कार दिले त्यांना दिशा दिली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचाराने प्रभावीत होऊन सहकाराची, राजकारणाची, समाज सेवेची गोडी निर्माण झाली.
ग्रामीण विकासाची संकल्पना घेवून आपले समाज विकासाचे कार्य सुरु केले.
गोरगरिब,शेतकरी यांचे जिवनमान उंचविण्यासाठी शेतकर्यांना त्यांनी संघटीत केले.
त्यांच्यासाठी भंडारदरा पाणी वाटप, मीटर हटाव यासह विविध मोर्चे-आंदोलने केली. दादाच्या माध्यमातून दादा पाटील व सहकाऱ्यानी गावोगावी सहकार चळवळ सुरु केली.
शेतकऱ्याच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजे सोसायटीची निर्मिती झाली . ३० वर्ष प्रतापपूर सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले.
त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उध्दाराचा मार्ग ठरला; मागे वळून न बघता ग्रामपचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासा करिता प्रयत्न केले.
अनेक वर्ष संरपच म्हणून काम केले तर पत्नी सावित्रीबाई हया ५ वर्ष संरपच तर मुलगा लक्ष्मण ५ वर्ष संरपच होते एकाचं परिवारातील पती, पत्नी व मुलगा संरपच होणे योगा योग होय.
रावसाहेब म्हस्के पाटील यांच्याशी जवळीक निर्माण झाल्याने बाभळेश्वर दूध संघावर काम करण्याची संधी मिळाली .
तापड व करारी स्वभावाचे असणारे दादापाटील यांच्या जीवनात धार्मिक, सहकार व राजकारणाची प्रवृत्ती निर्माण झाली त्यामुळेचं सामाजिक दायित्वाची चालना मिळाली..
नारायणगिरी महाराज, रामगिरी महाराज, नामदेव शास्त्री महाराज याच्या आशिर्वादाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ सुधीर तांबे, रावसाहेब म्हस्के यांच्याशी व समाज्याशी एकनिष्ठ राहीले; तर त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून धार्मिक, राजकिय व सामाजिक क्षेत्रात संपत, नवनाथ, लक्ष्मण वावरत असून मुलगी कुसुम महीला बालकल्याण आधिकारी झाल्याने आंधळे कुटुब आदर्शयुक्त आहे.
0 Comments