नाशिक : पिंपळगाव खांब येथील शेतकरी सोमनाथ बोराडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळ्याच्या निमित्ताने वेगळा संदेश देत शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
'' केंद्रीय कृषी कायदे रद्द होऊ दे , बळीराजाला न्याय मिळू दे ''
बैलपोळ्याच्या निमित्ताने हा संदेश बैल जोडीवर लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
केंद्रातील कृषी कायदे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय स्तरावर आंदोलन केले जात आहे.
या कायद्यानुसार जर शेतीमालाला भाव मिळाला तर व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. आणि भाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांची नुकसान होणार आहे. कृषी कायद्यांचा फायदा व्यापाऱ्यांना होणार असून मोठे भांडवलदार पैसे कमावणार आहेत.
त्यामुळे बैलपोळ्याच्या निमित्ताने हे अन्यायकारक कायदे रद्द करावे अशी मागणी बोराडे यांनी यानिमत्ताने केली.
बैल पोळ्याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देऊन काय रद्द करावे अशीही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
बैलांवर झालर लावून हा संदेश दिल्याने ही बैलजोडी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली.
0 Comments