उस्मानाबाद - अतिवृष्टीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून वाकडी ता.कळंब येथील १७ जन मांजराच्या पाण्यात अडकले असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
कळंब नगर परिषद,तहसिल कार्यालयातील आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मदत करून सुरक्षित ठिकाणी हलविले, अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून काही ठिकाणी गावांचा संपर्कही तुटला आहे.
जिल्ह्याच्या इतिहासात मोठा पाऊस झाल्याचे नागरिक सांगत आहेत. सोमवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडाली असून जिल्ह्यातील तेरणा, मांजरा प्रकल्पातील पाणी सोडले असून शेत आणि शिवारात पाणी पाहायला मिळत आहे.
नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असून कळंब तालुक्यातील देवधानोरा येथील तलाव फुटल्याने शेतजमिनी वरील सर्व पिके वाहून गेले आहेत.
कळंब-ढोकी-उस्मानाबाद व उस्मानाबाद-लातूर ही वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.
नदीच्या बाजूच्या गावातील नागरिकांनी काळजी घ्यावी व बाहेरगावी जाण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
कळंब शहरातही गांधी नगर,बाबा नगर या भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली, मुख्य बाजारपेठेत असलेल्या सुनील मार्केट मध्ये पाणी दुकानांत घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
वेगवेगळ्या विभागातील उस्मानाबाद बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या मांजरा नदीच्या पुलावर, मांजरा धरणावर अनेक नागरिकांची पाणी बघण्यासाठी गर्दी होत आहे .
त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून परिसरात फिरण्यास प्रतिबंध जाहीर केला आहे..
0 Comments