राहता तालुक्यातील कोल्हार येथे घडलेल्या एका घटनेचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये हातामध्ये नंग्या तलवारी लाकडी दांडके घेऊन एक मोठा समूह चाल करून जाताना दिसत आहे,
एकंदरीत या घटनेच्या अनुषंगाने कोल्हार भगवतीपुर येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे .
तर काही गैर ठरणार नाही मात्र या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी गेले असता एक छोट्या मुलीला धक्का लागल्याने झालेल्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती समोर आले आहे.
ज्यात अंबिकानगर वसाहतीतील २२ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत आलेल्या अमोल शंकर बर्डे एका छोट्या मुलीला धक्का लागला.
यावरून वाद झाला होता, तो समझोत्याने मिटविला होता, मात्र या वादाचा राग मनात धरून २३ सप्टेंबर च्या सकाळी जब्बार खान अफरोज शेख सलमान खान यांनी तलवार लाकडी दांडे यांच्या साह्याने दहशत निर्माण करून महिलेशी असभ्य वर्तन केले कोल्हार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
या संदर्भात स्नेहल विनायक वाकचौरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जब्बर खान अफरोज शेख सलमान खान व इतरांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४ ४५२ १४३ १४७ १४९ व आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,
सुलतान अस्लम शेख यांनी १२ वर्षे नातीस धक्का दिल्यानंतर अमोल बर्डे यांनी दारू पिऊन घरासमोर हातात कुर्हाड घेऊन भावाला शिवीगाळ कोणी केली असे म्हणत त्याचे हातपाय तोडून टाकीन अशी धमकी दिल्याचा आरोप करत भादवि कलम १४३ १४७ १४९ ५१० ५०४ ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु भर लोक वस्तीत दिवसा ढवळ्या हत्यारांचा वापर झाल्यामुळे कोल्हार भगवतीपुर परिसरात खळबळ उडाली असून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments