नाशिक - दिनांक २७ सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. याचा तडाखा नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. सध्या नाशिक मधे गोदावरी नदीला पूर आल्याचं दिसत आहे शिवाय गंगापूर धरण मोठ्या प्रमाणात भरलं आहे.
पिकांना पण काही प्रमाणावर नुकसान झालेले दिसत आहे. गंगापूर धरणातून आज ३००० क्युसेक्स करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक. पाटबंधारे विभाग, नाशिक यांनी कळविले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदुर शिंगोटे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली, निफाड तालुक्यातील चितेगाव हेदारणा पंचक्रोशी परिसरात पावसाने हजेरी लावली.
सर्व पूर प्रवण क्षेत्रात गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सतर्क रहावे. तसेच नदी व धरण पात्रात उतरू नये असा इशारा देण्यात आला आहे.
सर्व नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी व आपली वाहने, पशुधन सुरक्षित स्थळी हलवावे असा ही इशारा देण्यात आला आहे. गोदा काठावर पाण्यात मंदिर व भोवतीचा परिसर पाण्याखाली गेल्याचे दिसून आले.
0 Comments