उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात सलग आठ दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे काढणीसाठी आलेली सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.
पेरणी झाल्यानंतर काही दिवस उन्हाच्या कडाक्याने पिके कोमेजून जात होती.त्यातून कसेबसे पिकांनी फलधारणा केली, त्यातही काही झाडांना फळे लागली नाहित.
ज्या झाडांना फळे लागलीत तेही शेतक-याच्या ओंजळीत येतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सतत धार लागलेल्या पावसामुळे काही सोयाबीन च्या रानामध्ये पाणी थांबले आहे, काही शेतक-यांच्या रानामध्ये पाय घुसत आहेत, सोयाबीन व्यवस्थित काढता येत नाही.
जेव्हा काढण्यासाठी जातात तेव्हा वरून पाऊस चालू झाला की ते रानावरच भिजून जात आहे.कधी जोराचा पाऊस लागला की त्या पिकांचे नुकसान होऊन जाते;
पावसामुळे ओले झालेले सोयाबीनचे पिक मळणी करण्यासाठी एका जागी गोळा करतात आणि ते भिजू नये म्हणून त्यावर ताडपत्री झाकतात.
रान ओले असल्यामुळे मळणी करण्यासाठी मळणी यंत्र तिथ पर्यंत पोहचत नाही.काही शेतकऱ्यांच्या शेतांना रस्त्या अभावी मळणी यंत्र पोहचवता येत नाही, शेतकरी पाऊस थांबायची व रान वाळण्याची वाट पाहतात.तोपर्यंत ती सोयाबीन गोळा केलेला भनिम (ढीग), भुर्रा (बुरशी) किंवा काळा रंग चढून सोयाबीनची नासधूस होते.
त्यामुळे त्या सोयाबीन ला चांगला मोबदलाही मिळत नाही, कवडीमोल भावात तो बाजारात विकून टाकतो आणि निराश होऊन परत येतो..
शासकीय योजना आणि विमा त्वरीत मिळावा या साठी शेतकरी यांनी शासणाकडे मागणी केली आहे..
0 Comments