नाशिक - हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचे जोरदार कमबॅक केले आहे. आज दुपारी मनमाड- नांदगावसह परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले. तब्बल दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
सुमारे तासभर चाललेल्या पावसात नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले होते. पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले होते. बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची पुरती तारांबळ उडालेली दिसून आली.
ग्रामीण भागात पावसाचे जोरदार कमबॅक झाले असताना नाशिक शहरातही सकाळपासून पावसाचे वातावरण आहे. शहरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या मात्र दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.
नाशिककर अजूनही दमदार आणि मुसळधार अशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती आमचे प्रतिनिधी अनिकेत मशिदकर यांनी दिली.
0 Comments