नाशिक - अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात मा पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीची बातमी
मा पोलिस अधीक्षक यांनी मो व्ही एक्टच्या केसकरिता पेठरोड नाका दिंडोरी पोलिस स्टेशन हद्दीत असलेले पोलिस उपनिरीक्षक/कैलास देशमुख यांनी जिल्हा वाहतूक शाखा यांना सांगून
त्यांना कार्यवाही करणे बाबत सांगितल्याने पोलिस उपनिरीक्षक श्री कैलास देशमुख यानी जिल्हा वाहतूक शाखेकडील त्यांचे सोबत मो व्ही एक्टच्या केसेस करीता असलेल्या पोलीस कर्मचारी यांना मा पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे मार्गदर्शन करून
दिनांक ७/९/२०२१ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पेठरोड टोलनाका दिंडोरी पोलिस स्टेशन हद्दीत टोलनाका या रस्त्यावर सापळा रचून
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी क्रं:-एम.एच.१५ एचएच १०८७ यास पकडून वाहनावरील चालक मुज्ल्मील कफील शेख रा- सैय्यद शाह बाबा दर्गा जवळ, पठाणपूरा, जुने नाशिक यांना विचारपूस करता त्यांनी माचिसचे पुडे सांगून उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.
पिकअप चालक व वाहनाची कसून चौकशी व वाहन तपासले असता त्यामध्ये विमल पानमसाला, सुगंधीत तंबाखू (गुटखा) त्याचप्रमाणे वाहतूक करणारा पिकअप वाहन क्रं एम एच १५ एचएच १०८७ असा एकूण किंमत रूपये २३,८०,९२०/- रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कारवाई मा पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री सचिन पाटील यांचे मार्गदर्शन खाली दिंडोरी पोलिस हे करीत आहे.
● प्रेसनोट ●
0 Comments