मराठवाडा वॉटर ग्रीडचे काम या सरकारने बंद केले, वैधानिक विकास मंडळं बंद करून मराठवाड्याची कवच-कुंडलं काढून घेतली. हा मराठवाड्याच्या विकासाचा खून आहे.
विम्याचा राज्य सरकारचा हिस्साच मविआ सरकारने भरला नाही. त्यामुळे आज शेतकर्यांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत.
कोरोना काळात राज्य सरकारने एकाही घटकाला मदत नाही, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. केंद्राने दिलेले गरिबांसाठीचे अन्नही यांनी सडविले.
विकास-विरोधी, जन-विरोधी हे सरकार केवळ आणि केवळ लोकांच्या हक्काचे पैसे लुबाडण्यात व्यस्त आहे.
सुभाष साबने यांना निवडून देऊन ताळ्यावर नसलेल्या या सरकारला शॉक देण्याची संधी गमावू नका.
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सभे दरम्यान देगलूर येथे संबोधित केले.
0 Comments