गेल्या वर्षीही अशीच अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवली होती सर्वत्र पाणी पसरलं होतं शेतकऱ्यांची सोयाबीन व इतर पिके पूर्णतः नासून गेली.
तेव्हाही मंत्री, अधिकारी, राज्यकर्ते, नेते मंडळींनी पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागलं नव्हतं.
तशाही परिस्थितीत शेतकरी त्यात तग धरून राहिला पण ह्या वर्षी पिके चांगल्या पद्धतीने आलेली होती निसर्गाने साथ दिली होती पण अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सर्व स्वप्नाचा चक्काचूर केला व हातातोंडाशी आलेले पीक हिरावून नेले.
तरी गेल्या वर्षीचा खरीप पिक विमा 2020-21 अजून पर्यंत नाना पद्धतीचे निवेदने देऊन आंदोलन करून भेटला नाही.
तरी ह्या वर्षी आपण जे पाहणे दौरे करताय त्याचं काय फलीत मिळणार, तरी आम्ही आपणास विनंती करतो की येत्या आठवडाभरात आम्हाला हेक्टरी 50 हजार अतिवृष्टीचे नुकसान भरपाई जाहीर करावी.
२०२०-२१ खरिप पिकविमा मंजूर करून आणावा अन्यथा आम्हाला तुमच्या निर्णयाची वाट पाहून सर्व शेतकरी मिळून सामूहिक जलसमाधी घेण्या शिवाय पर्याय उरणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.
0 Comments