खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

दिवसभरात २८ हजार भाविक दर्शन घेऊ शकतील असे प्राथमिक नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे

नाशिक : सप्तशृंगी निवासनी देवी नवरात्रोत्सव येत्या ७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर रोजी असलेल्या कोजागिरी उत्सव म्हणून साजरी केला जाणार आहे, यामध्ये ताशी १ हजार २०० भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. तर दिवसभरात २८ हजार भाविक दर्शन घेऊ शकतील असे प्राथमिक नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भाविकांनी मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवूनच दर्शनासाठी यायचे आहे; ज्या भाविकांचे लसीकरण झाले असेल अशाच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 
तर स्नानासाठी असलेले शिवालय तीर्थ भाविकांसाठी बंद असेल, बाहेर गावाहून आलेल्या भाविकांनी नांदुरीच्या पायथ्याशी असलेल्या बस स्थानकावरून महामंडळाच्या बसने तिकिट काढून व तपासणी करत भाविकांना गडावर दर्शनासाठी जाता येईल.
तसेच भाविक भक्तांनी स्वच्छता ठेवावी,पोलीस बंदोबस्त, भाविक भक्तांना मोफत महाप्रसाद, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बाहेरील व्यापारी दुकाने लावण्यास बंदी असेल साहाय्यक उपजिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक कळवण, तहसीलदार बंडू कापसे, कळवण, गटविकास अधिकारी पंचायत समिती कळवण, सहायक पोलिस निरीक्षक कळवण, उपजिल्हा रुग्णालय / ग्रामिण कळवण, तालुका वैधकीय अधिकारी कळवण, वनपरिक्षेत्र कळवण, महावितरण विभाग कळवण, उप-अभियंता सांबा विभाग कळवण १ /३/ ४, ग्रामपंचायत सप्तशृंगीगड, सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट, रोपवे ट्रॉली सप्तशृंगी गड, पाणीपुरवठा अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत नांदुरी, राज्य परिवहन महामंडळ कळवण, तलाठी, ग्रामसेवक व व्यापारी उपस्थित होते.
असे आहेत नियम

७ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर काळात मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे असेल

पासशिवाय मंदिरात प्रवेश मिळणार नाही

६५ वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षाखालील मुलांना गडावर दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही

पाससाठी करोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल

तसेच ७२ तासामधील आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे
किंवा २४ तासातील अंटीजन टेस्ट अनिवार्य असेल

मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असेल

सामाजिक अंतर ठेवून मंदिरात दर्शन दिले जाईल.

नवरात्र काळात नांदुरी व सप्तशृंगीगड येथे यात्रा भरण्यास परवानगी नसेल
नांदुरी येथे खासगी वाहनतळावर भाविकांना त्यांचे खासगी वाहन पार्क करावे लागेल

भाविकांसाठी नांदुरी ते सप्तशृंगीगड बससेवेची सोय केली आहे

राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये प्रवेश करताना पास दाखविणे अनिवार्य आहे

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ५० टक्के क्षमतेने प्रवासासाठी परवानगी आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools