खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

वानखेडेसह बोगस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा - भीम आर्मी भारत एकता मिशनची मागणी

मुंबई - शाहरुख खान पुत्र आर्यन याच्या कथित अटक प्रकरणानंतर  नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो ( एनसीबी) चे संचालक समीर वानखेडे व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील दाव्या - प्रतीदाव्याने राज्यात संभ्रमाचे वातावरण असून या प्रकरणासह आरक्षित पदावर काम करणाऱ्या सरकारी सेवेत कार्यरत बोगस अधिकारी वर्गाची   वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करून दोषीविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे..
समीर वानखेडे हे नक्की मुस्लीम, हिंदू की मागासवर्गीय याविषयी महाराष्ट्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटत व्यक्त होत आहे.
एका मोठ्या अधिकाऱ्या विषयी एका राजकीय पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे मंत्री जबाबदारीने बोलत असल्याचा दावा करीत कागदपत्रे सादर करीत असतील तर हा विषय अत्यंत गंभीर असून वानखेडे यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यां विषयी देखील संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे..
दलित अत्याचार, अनुशेष, पदोन्नती, विशेष घटक योजना निधीचा पुरेपूर वापर या मुद्द्यांवर नोकरशाहीच्या दिसणाऱ्या उदासीनतेला बोगस मागास अधिकाऱ्यांची प्रशासनात झालेली मोठी घुसखोरीच कारणीभूत आहे, असा थेट आरोप भीम आर्मीने केला आहे.

अनुसूचित जाती - जमातींना संविधानिक सवलतींचा लाभ मिळण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रां पैकी सुमारे २५ टक्के प्रमाणपत्रे बोगस असतात, असे निरीक्षण खुद्द सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नोंदवलेले आहे, अशी आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून देण्यात आली आहे .

मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षणाचा ज्वलंत विषय राज्यात प्रलंबित आहे यावर सरकारने अद्याप दिलासा दिलेला नाही सन २००० पासून महाराष्ट्रात जात पडताळणी कायदा २००० अस्तित्वात आला.

या कायद्यापूर्वी पासून  एमपीएससीमार्फत सेवेत आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्यातील अनेक अधिकारी पदोन्नतीने आय ए एस चा दर्जा मिळवून सन्मानाने निवृत्त देखील झाले आहेत. 
खऱ्या मागासांची संधी हिरावून घेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी शासकीय सेवेतील मागास अधिकाऱ्यांची फेर जात पडताळणी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे व महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे  कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड यांनी केली आहे..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools