मुंबई - सध्या राज्यात गाजत असलेला समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीमध्ये हिंदू दलित समाजाचे कार्ड वापरून आज पुन्हा वानखेडे परिवाराने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेवून आम्ही आंबेडकरीवादी आहोत, असे त्यांनी घोषित केले आहे,
परंतु एवढया दिवसात हे कुंटूंब कधी हिंदू - हिंदू म्हणत होते. आता ते आंबेडकरवादी असल्याचे सांगत आहेत.
ते आंबेडकरवादी आहेत हा खोटा अपप्रचार कदापि आम्ही खपवून घेणार नाही,
असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी फेसबुक लाईव्ह येऊन दिला आहे
मंत्री रामदास आठवले हे आमचे नेते आहेत, दलित पॅंथर संस्थापक पँथर नेते पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढोले, ज वि पवार यांच्यासोबत काम केले, त्यांचा आंबेडकरी समाज सन्मान करीत असतो, परंतु त्यांनी समीर वानखेडे यांना पाठीशी घालू नये, असेही कांबळे म्हणाले.
समीर वानखेडे हे आंबेडकरीवादी असते तर त्यांनी आंबेडकरी चळवळीत योगदान दिल्याचे अन्यथा आंबेडकरीवादी असल्याचा एखाद्या पुरावा सोशल मिडीयावर सादर करावा, असे आव्हान भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे यांनी बोलताना केले आहे.
लवकरच राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला भेटून समीर वानखेडे यांच्या जात पडताळणीची चौकशी करण्यास पत्रव्यवहार करून पत्रकारांना माहिती देणार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
0 Comments