उस्मानाबाद : प्रा शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा-लोहारा तालुक्यातील विविध गावांमध्ये ११ शाखा सुरु करण्याचा संकल्प आम्ही केला होता.
काल आनंदनगर मुरुम ता उमरगा, जि. उस्मानाबाद येथे वाचनालयाच्या १० व्या शाखेचे तर आज कानेगाव, तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे वाचनालयाच्या ११ व्या शाखेचे उद्घाटन करुन हा संकल्प आम्ही पूर्ण केला आहे.
आनंदनगर येथील उद्घाटन प्रसंगी सरपंच श्री सोनकांबळे, श्री मंगेश देडे व ग्रामस्थ तर कानेगाव येथील उद्घाटनप्रसंगी सरपंच श्री नामदेव लोभे, श्री सुधीर चंदनशिवे व गावातील तरुण मंडळी उपस्थित होती.
दोन्ही उद्घाटनाला ॲड शितल चव्हाण फाऊंडेशनचे अध्यक्ष मा सत्यनारायण जाधव, खजिनदार धानय्या स्वामी, सहानूभूतीदार मा प्रदिपजी मोरे, सदस्य विजय चितली व अभिशेक शिंदे उपस्थित होते.
आता प्रा शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालये मुळज, होळी (०२), काळा निंबाळा, उमरगा, कदमापूर, कोळसूर (गुं), बेट जवळगा, सालेगाव, आनंदनगर आणि कानेगाव अशा ११ ठिकाणी कार्यान्वित आहेत.
0 Comments