अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील व आश्वी जिल्हापरिषद गटातील महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत सहकारी, कॉग्रेस पक्ष तसेच प्रवरा शेतकरी मंडळाचे जेष्ठ नेते सतीष रामचंद्र गोडगे (वय - ६७) याचे गुरुवारी निधन झाले, असून त्याची निधनवार्ता आश्वीसह परिसरात माहिती होताचं सर्वत्र शोककळा पसरली असून समाज माध्यमातून त्याना श्रध्दांजली अर्पण केली जात आहे.
दिवगंत सतीषराव गोडगे यानी संगमनेर मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक तथा माजी उपसभापती म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून आश्वी परिसरात परिचित होते,
आश्वी बुद्रुक येथिल रयत शिक्षण संस्थेच्या स्कूल कमिटीचे ते सदंस्य होते.
तसेचं प्रवरा सहकारी दुध संस्था बाभळेश्वरचे संचालक म्हणूनही त्यानी काम केले होते. प्रगतशील शेतकरी, एक चागले व्यावसायिक तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले हसतमुख व्यक्तीमत्व असल्याने सर्व पक्षात त्याचा मोठा मित्र परिवार आहे.
रावसाहेब म्हस्के, रविद्रं देवकर, अरुण कडू पाटील याचे ते पुरवाश्रीमीचे सहकारी होते.
दरम्यान त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातंवडे असा मोठा परिवार असून येथिल प्रशांत गोडगे व अमित गोडगे यांचे ते वडील होते.
शुक्रवारी सकाळी दिवगंत सतीषराव गोडगे याच्या पार्थिव देहावर आश्वी बुद्रुक येथिल प्रवरातीरावर अत्यसंस्कार केले जाणार आहेत..
संगमनेर प्रतिनिधी - अमोल घुगे
0 Comments