अहमदनगर - राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे एक निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्या मुलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून डांबून ठेवले मुलांची सुटका करण्यासाठी गेले असता श्रीरामपूर येथील पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यावर आरोपीने गोळीबार केला.
या घटनेत पोलीस उपाधीक्षक मिटके थोडक्यात बचावले ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे.
त्याने सकाळी दहा वाजेच्या सुमारास नानोर यांच्या घरात प्रवेश केला, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले आरोपी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे
त्यांच्या जवळील रिवाल्वर वैशाली नानोर व त्यांच्या दोन मुलांवर तानाली नानोर यांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाईल वरुन परीजनांना या घटनेची माहिती दिली.
त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलिसांचा फौजफाटा तेथे दाखल झाला डी वाय एस पी मिटके हेही दाखल झाले सुमारे दोन तास हे सुरू होते अखेर यांनी आरोपीवर झडप घालून त्यांच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी रिवाल्वर मधून गोळी सुटली ती उपअधीक्षक मिटके यांच्या डोक्या जवळून गेली संदीप मिटके हे थोडक्यात बचावले.
जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे हे घटनास्थळी दाखल झाले,
आरोपी निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील लोखंडे यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान आरोपी यांनी दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, व त्यांना खंडणी मागितली होती, याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे हा गुन्हा मागे घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजत आहे.
0 Comments