औरंगाबाद - दिवसापूर्वी दौलताबाद - औरंगाबाद येथील ऊसतोड ठेकेदारांनी इंदौर मध्यप्रदेश येथील मजुरांना काम करण्यासाठी बोलवून घेतले, परंतू काम दिले नाही 8 दिवस बसवून ठेवले त्यानंतर या मजुरांनी परत गावी जाण्याचा निर्णय घेतला असता, दुसरा ऊसतोड ठेकेदार त्यांना जण्यास मज्जाव करत होता तेव्हा मजुरांनी भीम आर्मी दिल्ली कार्यालयात फोन द्वारे माहिती दिली,
लगेच तेथून आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा राहूलदादा प्रधान यांना फोन आला त्यांनी बाळुभाऊ वाघमारे यांना माहिती दिली असता बाळुभाऊ वाघमारे यांनी दौलताबादचे सरपंच पवनभाऊ गायकवाड यांना मदत करण्यास सांगितले,
पवनभाऊ गायकवाड तात्काळ घटना स्थळी पोहचले तेव्हा ठेकेदार तेथून पळून गेला, औरंगाबाद वरून भीम आर्मी टीम निघाली असता पवनभाऊ नी सांगितले कि इकडे येऊ नका या सर्व मजुरांना मी रिक्षाने औरंगाबादला पाठवत आहे, जेव्हा औरंगाबाद बसस्टँड वर ते आले तेव्हा त्या मजुरांचे हाल आम्ही बघितले, 7 पुरूष 7 महीला व सोबत 22 लहान लहान मुले होते..
आम्ही त्यांना सांगितले की हम भीम आर्मी के कार्यकर्ता है आपके लिये आये है तेव्हा त्यांचे सुकलेले चेहरे आनंदित झाले त्यांच्यातील धर्मेंद्र आदिवासी या तरुणाला मी सर्व विचारपूस केली, संघटनेचे राष्ट्रीय सचिव तसेच महाराष्ट्र प्रभारी मा दत्तूभाई मेढे (मध्यप्रदेश) यांच्या सोबत बोलणे करून दिले ..
सर्व मजुरांना पुरी भाजी जेवण करून ट्रॅव्हल्स चे तिकीट काढून बसवून दिले या वेळी निखिल खरात, सुहास वाहुळ, कचरू गोडबोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments