दरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनी गाडीची झडती घेतली असता सादर गाडीतून पिशवीभर गांजा अमली पदार्थात पुड्या आढळून आल्याने पोलिसांनी गाडीतील तुषार शेकडे वय वर्ष 24, इरफान शेख वय वर्षे 21, तोफिक इनामदार वय वर्षे 34, मोमिन अत्तार वय वर्ष 20 सर्व राहणार जुन्नर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले.
त्यातील समीर शिंदे हा अंधाराचा फायदा घेऊन तेथून पसार झाला, मात्र समय सूचकता दाखवता पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात हजर करत चौकशी केली.
त्यातील सर्व जण हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे श्रीरामपूरला आल्याची माहिती त्यांनी दिली, यादरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेला समीर शिंदे हा युवक नेमकी कोण होता ? तो अजून काही गांजा पूडी घेऊन तर फरार झाला नाही ना ?
जेव्हा पोलीस विचारपूस करत होते त्यावेळेस तो पसार झाला तो प्रसार का झाला ?
गांजा तस्करीसाठी श्रीरामपूर मध्ये काय कनेक्शन आहे गांजा हा श्रीरामपूर मध्ये कोणाकडे घेऊन येत होते?
असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे, ओमिनी मधून आलेल्या इसमांना श्रीरामपुरात कशासाठी आले असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने हे सर्वजण दरोड्याच्या उद्देशाने आले असल्याचा संशय आल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 399 अन्वेय 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला,
या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस कशा पद्धतीने लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे असे पोलीस सांगत आहे.
अहमदनगर प्रतिनिधी - जालिंदर अल्हाट
0 Comments