महाराष्ट्र - एड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने येत्या रविवार पासून राज्य भरात संविधान जनजागृती सन्मान रथयात्रा सुरु होत आहे .
पुणे येथून सुरुवात करण्यात येणाऱ्या या रथयात्रेचा समारोप ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी या ठिकाणी होणार असून नंदुरबार येथील पोलीस कवायत ग्राउंड येथे दुपारी २ वाजता चंद्रशेखर आझाद यांच्या संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी दिली.
देशात आणि राज्यात स्वातंत्र्यसैनिक देश आणि भारतीय संविधान तसेच देशातील लोकशाही संदर्भात उलटसुलट चर्चा उपस्थित करून देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघटनवादी शक्तीचे मनसूबे उधळून लावून लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी हि रथयात्रा अधिक फलदायी ठरेल असा विश्वास गंगावणे यांनी व्यक्त केला आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने २१ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर अशी १६ दिवसांची महाराष्ट्र व्यापी संविधान जनजागृती सन्मान रथयात्रेचे आयोजन केले.
रविवार दिनाक २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रथयात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे ;
या संघटनेचे महाराष्ट्र पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
नंदुरबार येथील पोलीस कवायत ग्राउंड येथे २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता चंद्रशेखर आझाद यांच्या संविधान सन्मान सभेसाठी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंग, राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र प्रभारी दत्तुभाई मेढे यांच्यासह महाराष्ट्र पदाधिकारी व कोअर कमिटी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित राहणार आहेत.
नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजू रगडे व जिल्हा कमिटीने यांनी या सभेचे नियोजन केले असून हि सभा महाराष्ट्र भीम आर्मी तसेच महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ठरेल असा विश्वास गंगावणे यांनी व्यक्त केला.
पुणे, भीमाकोरेगाव, अहमदनगर, लोणी, नाशिक, नदुरबार, धुळे, जळगाव, भुसावळ, औरंगाबाद, जालना, अमडापूर, बुलढाणा, शेगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली वसमत, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, महाड, नवी मुंबई, वाशी, घोडबंदर ठाणे, काशिमिरा, हनुमान नगर कांदिवली, खेरवाडी वांद्रे, वरळी व दादर चैत्यभूमी असा संविधान जनजागृती सन्मान रथयात्रेचा मार्ग राहणार असल्याची माहिती गंगावणे यांनी दिली आहे.
सदर यात्रेदरम्यान संविधान प्रास्ताविक जाहीर वाचन २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित विशेष मार्गदर्शन तसेच संविधानाने देशातील लोकांना दिलेले अधिकार आदीबाबत भीम आर्मी तसेच विविध शेत्रातील मान्यवर व जेष्ठ तज्ञ यांच्याकडून जनतेसाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .
जनतेने सशक्त भारत निर्माणासाठी या रथयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन या संघटनेचे कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड, मुख्य महासचिव सुनील थोरात, महासचिव अविनाश गायकवाड, प्रमुख संघटक दिपकभाऊ भालेराव यांच्यासह महाराष्ट्र पदाधिकारी यांनी केले आहे.
0 Comments