औरंगाबाद - देशविरोधी मनुवादी धोरणाचे दहन ऑल इंडिया पँथर सेनेचं संविधान राष्ट्र बचाव आंदोलन
आरएसएसचं हिंदूराष्ट्र निर्मितीचं धोरण सत्तेच्या माध्यमातून राबवण्यात आलं..
जनसत्ता नाही तर धर्मसत्ता गाजवण्यात आली. नरेंद्र मोदी सरकार हे मनुस्मृतीच्या आधारे चालणारे सरकार आहे. संविधान जाळण्याची हिंमत देशद्रोहीने केली, आम्ही संविधान बदलवण्यासाठी आलो म्हणणाऱ्या प्रवृती मोदी सरकार मध्ये आहेत.
संविधानवादी स्वातंत्र्याला भीक म्हणणाऱ्याना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
आरक्षण घालवण्यासाठी सरकारी कंपन्या विकण्यात आल्या आहेत. वर्षभर शेतकरी आंदोलन झालं तो ही एक दुर्दैवी विक्रम या देशात झाला. शेतकरी आंदोलकांवर गाडी घालून चिरडून टाकण्याचा पराक्रम सुद्धा यांनी केला. आंदोलकांना कधी आंदोलनजीवी, कधी, नक्षलवादी, कधी खलिस्तानि, कधी दहशतवादी म्हणून हिनवण्यात आले. यूएपीए अंतर्गत निरपराध विचारवंत, कार्यकर्ते डांबण्यात आले.
भाजप दंगलखोरांना मंत्री पद दिली, दहस्तवादी प्रवृतीना खासदार केले.
अच्छे दिन, 15 लाख हे जुमले होते, अंबानी आडानीला अच्छे दिन आले, 15 लाख कुणाला मिळाले नाही पण कर्जबाजारी सगळे झाले. देश अपंग अवस्थेत आहे. उदयोगपतीच्या विकासासाठी गेली सात वर्षे सरकार काम करत आहे. पॅकेज घोषणेपुरते मर्यादित राहिले.
हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी कायदे व संविधानाचे धार्मिक शत्रू निर्माण केले गेले. संविधानराष्ट्र उद्धवस्त करण्याचा मुख्य अजेंडा आरएसएस भाजप राबवत आहे. संविधान दिनी संविधानवादी असल्याचे ढोंग करायचं, महामानवास खोटं खोटं अभिवादन करायचं आणि धोरण मात्र गोळवलकरांचं राबवायचं हाच एककलमी कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींच्या धर्मसत्तेपासून संविधानराष्ट्राला धोका आहे. त्यामुळे आज ऑल इंडिया पँथर सेना संविधानराष्ट्र बचाव आंदोलन करत आहे. संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करणार आहोत.
काळे धोरण : ईव्हीएम धोरण, शेतकरी काळे कायदे, पेट्रोल डिझेल महागाई धोरण, गॅस-खाद्य तेल महागाई धोरण, बेरोजगारी धोरण, महिला अत्याचारी धोरण, बलात्कारी धोरण, आंदोलन मिटाव धोरण,
CAA-NRC धोरण, सरकारी कंपन्या विकणे धोरण, खाजगीकरण धोरण, ड्रग्स माफिया अडाणी बचाव धोरण, मॉब लिंचिंग धोरण, दलित आदिवासी मिटाव धोरण, हिंदू-मुस्लिम दंगल धोरण, मनुवादी धोरण,
धर्मसत्ता धोरण, धर्मराष्ट्र निर्मिती धोरण, अंबानी-अडाणी विकास धोरण, अभिव्यक्ती हत्या धोरण, धर्मनिरपेक्षता विरोधी कर्मठता धोरण, मानवता विरोधी उन्मादी धोरण, मनुस्मृती पुनर्जीवित धोरण,
नोटबंदी आर्थिक नाकेबंदी धोरण, सामाजिक गुलामी धोरण, आर्थिक गुलामी धोरण, धार्मिक दहशतवाद, बेटी मिटाव धोरण
हे सर्व केंद्र सरकारने गेल्या सात वर्षात राबवलेले धोरण आहेत या सर्व मनुवादी धोरणाचे ऑल इंडिया पँथर सेना दहन करत आहे.
या वेळी जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे, बंटी सदाशिवे, सचिन तिवारी, शुभम मगरे, बळीराम ढेरे, सुनीला भगोरे, विकास शेजवळ, अमर लोखंडे, अमोल शेजवळ, आदित्य रगडे, कमलेश दाभाडे,
पवन चव्हान, रोहन सरोदे, दिनेश शेळके, मिलिंद नरवडे, विनोद कसारे, गणेश बगळे, सुरज जगधने, रोहित जगधने, सुभाष बोर्डे, धीरज मस्के, अमोल पवार, विनोद अंबोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
औरंगाबाद प्रतिनिधी : रतन गायकवाड
0 Comments