भेटी मध्ये देवराजदादा वीर आणि पँथर अनिलभाऊ पगारे यांनी " सामाजिक परिवर्तन आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना स्वबळावर आर्थिक मजबूती कशी करता येईल " या विषयावर सलग दोन तास चर्चा करण्यात आली.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील आणि औरंगाबाद जिल्ह्य़ातील ज्येष्ठ पँथर तसेच आपले पूर्ण आयुष्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी, समाजाला न्याय देण्यासाठी, रात्रंदिवस गोरगरीब जनतेला मदत करणारे, पँथर समाधान तायडे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीमध्ये पँथर समाधान तायडे यांनी समाजासाठी केलेल्या सर्व कामाची भाषणे, आंदोलने, उपोषणे, अशी बरीच माहिती, सामाजिक लढाईतील छायाचित्रे (फोटोज) पाहण्याचा योग मिळाला.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे आणि आजाद समाज पार्टी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संपादक किरण आरके यांनी पँथर समाधान तायडे यांनी चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या स्वतःच्या तब्येतेची काळजी घ्यावी अशी विनंती केली.
तसेच त्या नंतर पँथर अनिलभाऊ पगारे हे भोकरदन कडे रवाना झाले अशी माहिती औरंगाबाद शहर प्रतिनिधी रतन गायकवाड यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली.
0 Comments