खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

आजपर्यंत जे कोणत्याही महान देवमानसाला जमलं नाही ते बाबासाहेबांनी केलं आहे - सुनिल गायकवाड

मुंबई  - गद्दारी सोडून दे आणि माणूस बन, आम्हाला माहीतच आहे की, तुला बाबासाहेब बनता येणार, आणि ते तुलाही माहीत आहे की, कुणालाच बनता येणार नाही. 

कारण आजपर्यंत जे कोणत्याही महान देवमानसाला जमलं नाही ते बाबासाहेबांनी केलं आहे. 

 तुझ्या आपल्या मजेसाठी आणि स्वार्थासाठी, चांगल्या माणसांना समाजाच्या अडचणींवर काम करणाऱ्या माणसांना, विनाकारण गोत्यात आणणे सोड, त्यांना बदनाम करणे सोड. असं करून तू समाजाचे नुकसान करीत आहेस. उद्याच्या पिढीला पुन्हा शूद्र, अछूत, बनवण्यास तू कारण ठरणार आहेस. 
वर्गन्या खाण्यात दंग राहून, कळत काहीच नाही पण विनाकारण चर्चेत राहून, वाद करून, लोकांचे अपमान करून, स्वतःचे शहाणपण दाखवण्यासाठी वाद करून, समाज बरबाद झाला तरी चालेल पण माझंच खरं असे वागून, खोटे बोलून, लोकांना फसवून, बाबासाहेबांचा कार्यकर्ता बनून फिरणे सोडून दे.

आणि समाजासाठी खड्डा खणू नको, आणि असा आपल्या बाळांचा कर्दनकाळ बनू नकोस. नाहीतर, उद्याच्या येणाऱ्या मुसीबतीचे कारण तूच आहेच हे नीट लक्षात ठेव, कारण एक फितूर (चमचा, गद्दार ) राज्याचा राजपाट घालवू शकतो. अगदी तसेच तुझ्या फितुरीमूळे पुन्हा पूर्ण समाजाचं नुकसान होऊ शकते हे ध्यानात घे. 

        जर तुला वाटतेय बांधवांसाठी, समाजासाठी, देशासाठी काही करायचे आहे.  

तर आधी विषय समजून घे, नंतर सर्वांशी आदराने बोल, किंवा प्रश्न विचार, सतत, लोकहिताचे कार्य करीत रहा, लोकांच्या मदतीसाठी उभा रहा, लोकांच्या अडचणी समजून घेवून त्या सोडविन्याचा प्रयत्न कर, चुकलेल्याना माफ करायला शिक.

लोकना एकत्र आणून, एक ताकत बनवून, संविधान काय आहे, जातिवाद काय आहे, व आज तो पुन्हा कसा वाढत आहे, जर संविधान बदलले तर काय परिणाम होतील ? 

हे लोकांना समजावून संगन्याचा प्रयत्न कर याची आज खुप गरज आहे, खंबीर बन निर्भीड बन दोन पैसे कमवायला भेटतात म्हणून जातीवाद्यांची साथ देऊ नको. कमवण्यासाठी काम कुणाबरोबरही कर तो व्यवसाय , व्यापार, नोकरी आहे.  

पण जिथे जातीवडचा विषय आला, तिथं जातीवादी यांचा विरोधच कर, आणि आपल्या भावांच्या बाजूने उभा रहा. त्यांचा आधार आसरा बन, त्यांना मार्गदर्शन कर. 

तुझ्याकडे लोकांना पाहून असे वाटले पाहिजे की, मी सुद्धा असा झालो पाहिजे, ताकत पैशात असतेच, पण त्या पेक्षा मोठी ताकत विचारात असते, म्हणून एकच लक्षात ठेव विचारांना विकून पैसा कमवू नको.  

स्वाभिमानाला विकून पैसा कमवू नको. वेळच आली तर मार किंवा मर पण, लाचार बनून स्वतःला, आई बहिणीला , आणि समाजाला विकून पैसे कमवू नकोस

मर्द बन, लढवैया बन, हिम्मत ठेवून, कंबर कसून कामाला लाग. लोकांना देशाला तुझ्या कार्याचा गर्व वाटेल असे वागण्याचा प्रयत्न कर.  
आणि जर तुला हे जमत नसेल आणि लोकसेवा करण्याची इच्छा असेल तर जे हे चांगले कार्य करीत आहेत त्यांना पाठिंबा दे, त्यांना मदत कर, त्यांच्यात अडथळे आणू नकोस. लक्षात ठेव चतुर माणसाने आपल्या चातुराईचा उपयोग लोकांना मूर्ख बनविण्यासाठी केला तर लोक त्याला धोखेबाज आणि लबाड म्हणतात, पण त्याच चतुराईचा बुद्धीचा वापर त्याने लोककल्याना साठी केला.  तर लोक त्याला देव मानतात. 
म्हणून बाबासाहेब यांचे नाव घेऊन, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची फसवणूक करणे सोडून दे याला कार्यकरता म्हणत नाहीत, याला चिटर म्हणतात.

लेख - सुनिल गायकवाड
राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र
9821 564 158 
भीम आर्मी भारत एकता मिशन

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools