खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

बेलापूर ग्रामपंचायत संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत संचालित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शितल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचनालयाचे नियमित वाचक शिवदास दायमा श्री, भाऊसाहेब कुताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दिवाळीनिमित्त वाचकांना दर्जेदार दिवाळी अंकाचे मेजवानीच वाचनालयाच्या माध्यमातून मिळणार आहे; 

बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय परंपरा आहे, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नामांकित सदस्यांचे वाचनालय मानले जाते नवीन पुस्तके व दिवाळी अंक खरेदी नंतर त्यांचे वाचकांच्या माहितीसाठी प्रदर्शन भरवण्यात येते.

यावर्षीही दर्जेदार व वाचकप्रिय अंकांची ग्रामपंचायत वाचनालयाने उपलब्ध केलेले आहे, या अंकात परंपरेनुसार प्रदर्शन भरवण्यात येऊन त्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच महेंद्र साळवी, ग्राम विकास अधिकारी राजेश तगरे, ग्रंथपाल सौ उज्वला मिटकर (साळुंके), 

ज्येष्ठ नेते भास्करराव बंगाळ, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, रमेश अमोलिक गावकरी पतसंस्थेचे संचालक रावसाहेब अमोलिक, ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, सचिन साळुंके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते..

अहमदनगर प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools