उस्मानाबाद - कळंब तालुक्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, पद्मविभूषण खा शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वक्ता सेल प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांच्या सूचनेनुसार वक्ता सेलचे मराठवाडा सचिव तेजस भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली
शहरातील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे दि ११ डिसेंबर रोजी तालुका राष्ट्रवादी परिवार संवादातून कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात तेजस भालेराव यांनी आजच्या घडीला केवळ राज्यालाच नव्हे तर सबंध देशाला खा शरद पवार यांच्या विचारांची, आचरणाची नितांत गरज असल्याचे सांगितले.
खा शरद पवारांचे नेतृत्वात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तयार होत आहोत.
आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद करत या पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरात, राज्यात, देशात नक्कीच चांगले दिवस येतील.
त्याकरिता खा शरद पवारांचे आचार विचार तळागाळापर्यंत कसे पोहोचतील यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत.
खा शरदचंद्रजी पवार हे केवळ राजकीय क्षेत्रावर पुरते मर्यादित नसून कृषी, शैक्षणिक, क्रीडा, संरक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा सहभाग आणि मार्गदर्शन कायम देशाला लाभले आहे.
सर्व कार्यकर्त्यांनीएकजुटीने सामान्य जनतेपर्यंत आपला संपर्क वाढवून त्यांच्या अडचणी सोडविण्यावर प्रमुख भर द्यावा लागणार आहे.
जेणेकरून जनतेच्या मनात राष्ट्रवादी विषयी आपुलकीची भावना नक्कीच निर्माण होईल असेही मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे व जिल्हाध्यक्ष सुरेशजी बिराजदार, व्यसनमुक्ती सेल प्रदेशाध्यक्ष डॉ संदीप तांबारे, सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष प्रा.डॉ.संजय कांबळे, एड प्रविण यादव, जि प सदस्य महेंद्र धुरगुडे, तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर यांनी देखील खा शरद पवारांच्या कार्यावर मार्गदर्शन केले.
भूकंपातील खा शरदचंद्रजी पवारांच्या कार्याची आठवण करुन दिली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष प्रा सुरेशजी बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील,
व्यसनमुक्ती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ संदीप तांबारे, डॉ प्रतापसिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जि प सदस्य महेंद्र धुरगुडे,
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग मराठवाडा अध्यक्ष प्रा डॉ संजय कांबळे, तालुका अध्यक्ष प्रा श्रीधर भवर, तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, शहराध्यक्ष मुसद्देक काझी, तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, अल्पसंख्यांक अध्यक्ष मसुद शेख, जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस,
किसान सभा तालुकाध्यक्ष प्रकाश बावणे, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष आबासाहेब भोसले, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील, प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, सदस्य शंतनू खंदारे, तालुका कार्याध्यक्ष औदुंबर धोंगडे,
तालुका सरचिटणीस सुहास कवडे, शहर उपाध्यक्ष अजय जाधव, सचिव सौरभ मुंडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके, जलसिंचन विभाग तालुकाध्यक्ष अशोक जगताप,
राष्ट्रवादी विद्यार्थी उपजिल्हाध्यक्ष अतुल धुमाळ, तालुकाध्यक्ष भीमा हगारे, तालुका सरचिटणीस आफताब तांबोळी, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष शोभा मस्के, तालुकाध्यक्ष स्वाती भातलंवडे, उपाध्यक्ष मनिषा साळुंखे, शहराध्यक्ष संध्या तोडकर,
अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनंदा भोसले, जिल्हा सचिव दर्शना बचुटे, तालुकाध्यक्ष सोनाली माने, उपाध्यक्ष आम्रपाली बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा तुषार वाघमारे यांनी तर आभार तालुका कार्याध्यक्ष प्रा शिवाजी लकडे यांनी केले; अशी माहिती प्रतिनिधी अमोल रणदिवे.
0 Comments